Sunday, August 31, 2025 06:28:28 AM

भीषण वादळामुळे इंडिगो विमानाचे हवेत हेलकावे; प्रवाशांचा थरकाप

छत्रपती संभाजीनगरात एक थरारक बातमी समोर आली आहे. इंडिगोचे विमान वादळात सापडल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली होती.

भीषण वादळामुळे इंडिगो विमानाचे हवेत हेलकावे प्रवाशांचा थरकाप

विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरात एक थरारक बातमी समोर आली आहे. इंडिगोचे विमान वादळात सापडल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली होती. दिल्लीहून येणारे इंडिगोचे विमान छत्रपती संभाजीनगरजवळ येताच वादळाच्या भोवऱ्यात सापडले. त्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले.

हेही वाचा: तुळजाभवानीच्या मंदिरात थुंकणं भोवलं; आठ पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

नेमकं प्रकरण काय?

दिल्ली-छत्रपती संभाजीनगर इंडिगोचे विमान ठरलेल्या वेळेप्रमाणे संध्याकाळी 6:25 वाजता छत्रपती संभाजीनगरात येणार होते आणि दिल्लीला रवाना होणार होते. यासाठी, इंडिगोचे विमान छत्रपती संभाजीनगर शहराच्या हवाई क्षेत्रात दाखल झाले. परंतु, त्याच वेळी शहरात वादळ सुटले होते. अशा परिस्थितीत विमान कधी एका बाजूला, तर कधी दुसऱ्या बाजूने हेलकावे घेत होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अशातच, विमान लँडिंगसाठी परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे वैमानिकाने विमान नाशिककडे वळविले. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हे विमान पुन्हा शहरात दाखल झाले. या प्रसंगामुळे प्रवाशांना थोडा वेळ भीतीचा सामना करावा लागला असला, तरी वैमानिकांनी घेतलेल्या तात्काळ निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला.


सम्बन्धित सामग्री