Wednesday, September 03, 2025 12:54:57 PM

लोणार सरोवराचे अस्तित्व धोक्यात

काही दिवसांपासून लोणार सरोवराच्या कडांमध्ये भूस्खलन पाहायला मिळत आहे.

लोणार सरोवराचे अस्तित्व धोक्यात

बुलढाणा : दरवर्षी हजारो संशोधक, पर्यटक, अभ्यासक या लोणार सरोवराला भेट देत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून लोणार सरोवराच्या कडांमध्ये भूस्खलन पाहायला मिळत आहे. लोणार सरोवराला लागून असलेल्या मार्गावरून होत असलेल्या अवजड वाहतुकीमुळे हे भूस्खलन होत आहे की अन्य कोणत्या कारणामुळे याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तातडीने संपूर्ण गंभीर प्रकरणी पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग आणि वन विभागाने दखल घेऊन या जागतिक ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याची मागणी होऊ लागली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

हजारो वर्षांपूर्वी उल्कापाताच्या आघातातून तयार झालेले बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काही दिवसापासून लोणार सरोवराच्या कडांमध्ये भूस्खलन झाल्याचं पहायला मिळत आहे. लोणार सरोवराच्या कडांचे भूस्खलन असेच सुरू राहिल्यास लोणार सरोवराला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. लोणार सरोवरामुळे बुलढाणा जिल्ह्याला जागतिक पातळीवर पर्यटन, संशोधन, इतिहास आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मोठं महत्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा : Ladaki Bahin : लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास सुरूवात

लोणार सरोवराची वैशिष्ट्ये

लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. फार वर्षांपूर्वी एका उल्कापातामुळे या सरोवराची निर्मिती झाली आहे. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती सरोवर आहे आणि या सरोवराचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी या सरोवराला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.

 


सम्बन्धित सामग्री