सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचाच निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. पोलिसांवर गुन्हे दाखल करा असा निकाल सर्वोच्च न्यायालयानेही दिला आहे. त्यामुळे सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणी राज्य सरकारला धक्का बसला आहे. परभणीत संविधान विटंबनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं होतं. आंदोलनात सहभागी झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. यावेळी न्यायालयीन कोठडीत सूर्यवंशीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. यानंतर पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला. हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला. यानंतर हृदयविकाराचा दावा मुंबई हायकोर्टाकडून फेटाळला आला. पोलिसांवरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवल्याचे दिसत आहे.