पुणे: पुण्यातील नामांकित रुबी रुग्णालयात बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरण उघडकीस आले असून, याप्रकरणी तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा: 'महाराष्ट्राच्या समृद्धीचा महामार्ग'; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना
किडनी रॅकेट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून, किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये 12 लाख रुपयांची आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे तपासात उघड झाले आहे. 8 मार्च 2022 रोजी ससून रुग्णालयात झालेल्या प्रत्यारोपण समितीच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली होती. मात्र, अहवाल तीन दिवसांनी म्हणजे 11 मार्चला पाठवण्यात आल्यामुळे इतका उशीर का झाला याची चौकशी पोलीस करत आहेत. डॉ. अजय तावरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने परवानगी दिली होती. याप्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बँक व्यवहारांचीही चौकशी सुरू आहे. तसेच, डॉक्टर तावरे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा: 'युतीबाबत दोन्ही भावांनी फोनवरून चर्चा करावी'; पुतण्याचा काकांना सल्ला
नेमकं प्रकरण काय?
ससून रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक अजय तावरे यांनी पदाचा दुरुपयोग करून बनावट कागदपत्रांच्या मदतीने किडनी प्रत्यारोपण करण्यास परवानगी दिली होती. तसेच, या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचेही समोर आले आहे. या गुन्ह्यात त्याचे इतर कोणी साथीदार सहभागी आहेत का याचा तपास सुरू असल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी न्यायालयात सांगितले.