Monday, September 01, 2025 04:28:28 AM

गौरव आहुजाच्या माफीचा नवा नाट्यकल्लोळ – पुणेकरांनो, मला माफ करा!

पुण्यातील शास्त्रीनगर चौकात सकाळच्या गर्दीच्या वेळी गौरव आहुजाने रस्त्याच्या मध्यभागी गाडी उभी करून सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्याचा विकृत प्रकार केला. त्याचे सर्व कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले.

गौरव आहुजाच्या माफीचा नवा नाट्यकल्लोळ – पुणेकरांनो मला माफ करा

पुणे: भर रस्त्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाचा माज अखेर उतरताना दिसत आहे. कराड पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याआधी त्याने आणखी एकदा सार्वजनिक माफी मागितली आहे. पुणेकर, पुणे पोलिस आणि एकनाथ शिंदे यांचीही त्याने क्षमा मागितली.

अश्लील प्रकार आणि पलायनाचा नाट्यकल्लोळ
पुण्यातील शास्त्रीनगर चौकात सकाळच्या गर्दीच्या वेळी गौरव आहुजाने रस्त्याच्या मध्यभागी गाडी उभी करून सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्याचा विकृत प्रकार केला. त्याचे सर्व कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले. विशेष म्हणजे, नागरिकांनी जाब विचारल्यावरही तो उद्धट वर्तन करत घटनेच्या ठिकाणाहून फरार झाला.

कराड पोलिसांसमोर आत्मसमर्पण
घटनेनंतर गौरव आहुजा साताराच्या कराड परिसरात लपून बसल्याचे समोर आले. मात्र, वाढत्या दबावामुळे तो अखेर कराड पोलिसांसमोर शरण जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांकडून त्याच्यावर वैद्यकीय तपासणी केली जाणार असून, घटनेच्या वेळी तो मद्यप्राशनाच्या अवस्थेत होता का, याचा शोध घेतला जाईल.

गौरव आहुजा केवळ हा प्रकार करून चर्चेत आलेला नाही, तर त्याच्यावर याआधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.

▪ 2021 मध्ये विमानतळ पोलीस ठाण्यात अपहरण आणि जुगार प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद आहे.
▪ क्रिकेट बेटिंग गॅंगचा तो सक्रिय सदस्य असून, कुख्यात गुंड सचिन पोटेच्या टोळीशी त्याचा संबंध आहे.
▪ बेटिंगच्या व्यसनामुळे अनेक कॉलेज तरुण कर्जबाजारी झाले असून, टोळीने काहींना स्वतःच्या घरात चोरी करायलाही भाग पाडले होते.

सोलापुरात 22 कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू – बर्ड फ्लू की उष्णतेचा फटका?

पोलिसांची पुढील कारवाई

▪ गौरव आहुजा आणि त्याचा साथीदार भाग्येश निबजीयालासुद्धा अटक
▪ वैद्यकीय चाचणीनंतर पुढील तपास
▪ पुण्यातील गुन्हेगारी टोळीशी संबंध असल्याचा छडा लागण्याची शक्यता

गौरवची नाट्यमय माफी – खरे पश्चात्ताप की पोलिसी दबाव?
गौरव आहुजाने याआधीही व्हिडीओद्वारे माफी मागितली होती, मात्र पोलिसांना शरण जाण्याच्या आधी पुन्हा एकदा त्याने सार्वजनिक माफी मागितली. त्याच्या या वक्तव्यामागे खरा पश्चात्ताप आहे की वाढता दबाव? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे


सम्बन्धित सामग्री