अविनाश परबत. प्रतिनिधी. पुणे: गुरुवारी दुपारी गुजरात येथील अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया बोईंग 787 ड्रीमलायनर जेव्हा टेक ऑफ करत होता, तेव्हा मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत पिंपरी-चिंचवड येथील इरफान शेख (वय: 22) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एअर इंडियाच्या या विमानातून 169 भारतीय, 53 ब्रिटन नागरिक, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिक प्रवास करत होते.
हेही वाचा: AHMEDABAD PLANE CRASH: विमान अपघातातून अकोल्याची ऐश्वर्या थोडक्यात बचावली
इरफान शेख आपल्या कुटुंबासोबत पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर परिसरात वास्तव्यास होता. इरफान शेख हा एअर इंडियाच्या विमानात कॅबिन क्रू म्हणून कार्यरत होता. मात्र काल त्याचा एअर इंडियाच्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी त्याच्या कुटुंबीयांना मिळाली आणि कुटुंबीयांवर एकच दुःखाचा डोंगर कोसळला.
हेही वाचा: AMBANI ON PLANE CRASH: विमान अपघाताचा संपूर्ण रिलायन्स कुटुंबाला दुःख
बकरी ईदच्या दिवशी इरफान शेख आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात आला होता. एअरलाइन्समध्ये करिअर करण्याचं त्याचं उद्देश्य होतं. पण काळाने इरफान शेखला आपल्यापासून हिरावून घेतलं. इरफानचा पार्थिव आणण्यासाठी इरफानची आई आणि त्याचा भाऊ अहमदाबादकडे रवाना झाला आहे. मात्र, 'त्याच्या कुटुंबीयांची डीएनए तपासणी झाल्यानंतरच इरफानच पार्थिव त्यांना सुपूर्द करण्यात येईल', अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.