Thursday, September 04, 2025 02:40:26 PM

बीडच्या राखेतून सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची मैत्री बाहेर पडली; जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका

साडेचार तास भेटीत त्यांनी नेमकी काय केलं असेल? दोघांनी गळ्यात गळे घालून गाणे म्हणाले असतील, असं म्हणतं त्यांनी मुंडे आणि धस यांच्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

बीडच्या राखेतून सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची मैत्री बाहेर पडली जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका
Jitendra Awhad On Suresh Dhas
Edited Image

Jitendra Awhad On Suresh Dhas: बीडच्या राखेतून आमदार सुरेश धस Suresh Dhas) आणि धनंजय मुंडे यांची मैत्री बाहेर पडली, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (सपा) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे. शुक्रवारी भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात गुप्त भेटी झाली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. आता या भेटीवर जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. 

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, सध्याच्या काळात सुरेश धस हे क्षमाशील झाले असून संत परंपरेवर चालले आहेत. कोणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका, असे त्यांचे म्हणणे आहे. धस यांनी संतोष सूर्यवंशी यांच्या आईला देखील असाचं सल्ला दिला. ते म्हणाले होते की, पोलिसांनी संतोष सूर्यवंशी यांना मारले असेल तर त्याला माफ करून टाका. मग आता धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मीक कराड यांना देखील माफ करून टाकले पाहिजे, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. 

हेही वाचा - षडयंत्र रचणाऱ्यांचा धस बंदोबस्त करणार...
 
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, साडेचार तास भेटीत त्यांनी नेमकी काय केलं असेल? दोघांनी गळ्यात गळे घालून गाणे म्हणाले असतील... तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा, असं म्हणतं त्यांनी मुंडे आणि धस यांच्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

धनंजय मुंडेंसोबतच्या भेटीनंतर सुरेश धस यांच्यावर टीका - 

गेल्या दोन महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या मागील मारेकऱ्यांना पकडण्यासंदर्भात, बीड जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या 78 कोटींचा गैरव्यवहार, कृषी खात्यातील अनेक साहित्य खरेदीच्या गैरव्यवहार, त्याचप्रमाणे परळी येथील आंधळे यांच्या मृत्यू प्रकरण यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांचा हात असल्याचे वारंवार आरोप करून मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सुरेश धस यांनी प्रयत्न केला. परंतु, आता तेचं मुंडे यांची गुप्तभेट घेत असतील, तर याला नेमकी काय म्हणायचं ? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.  

हेही वाचा - भाजप अध्यक्ष निवडीची प्रक्रिया मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार 

दरम्यान, मराठा समाजाचे अनेक तरुण सुरेश धस यांना आयडॉल समजायला लागले होते. त्यातचं त्यांनी अचानक मंत्री धनंजय मुंडे यांची दोन वेळा भेट झाली, अशी कबुली दिली. त्यानंतर आता त्यांच्यावर चहूबाजूने टीका होताना दिसत आहे. मराठा आंदोलन प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. सुरेश धस यांच्याकडून मराठा समाजाला अशा अपेक्षा नव्हत्या. सुरेश धस यांना मराठा समाज माफ करणार नाही, असा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. 


सम्बन्धित सामग्री