नाशिक: नाशिक- मुंबई कसारा घाटात गेल्या काही दिवसांपासून काम सुरु आहे. याच पार्शवभूमीवर आता कसारा घाट 6 दिवस बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी पुढील 6 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आलाय. यामुळे पुढील सहा दिवस जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यात अवजड वाहनांना सहा दिवस पूर्णपणे बंदी असणार आहे. दिनांक 24 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च ते 6 मार्च या दोन टप्प्यात नाशिक- मुंबई कसारा घाट बंद असणार आहे.
हेही वाचा: कपाळावर कुंकू लावण्यासंदर्भात डॉ. तारा भवाळकरांचं मोठं विधान
जुना कसारा घाट दुरुस्तीसाठी बंद राहणार असल्याने लहान वाहनांची वाहतूक नवीन कसारा घाटातून वळवण्यात येणार आहे. पण तेथे अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहे. ही अवजड वाहने मुंबई-पुणे महामार्गाकडे वळवण्यात येणार आहे. दरम्यान कसारा घाट 6 दिवस बंद राहणार असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणारे.
सहा दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी ६ या कालावधीत मुंबई-नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे. जुना कसारा घाट दुरुस्तीसाठी बंद राहणार असल्याने लहान वाहनांची वाहतूक नवीन कसारा घाटातून वळवण्यात येणार आहे.