रायगड : महायुती सरकारमधील पालकमंत्रिपदाची यादी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोस दौऱ्यावर जाण्याआधी मंजूर केली. या यादीत काही मंत्र्यांना डावललं गेल्याने मंत्र्यांनी त्याबाबत नाराजीचा सूर आळवला आहे. रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळायला हवं अशी आग्रही मागणी शिवेसनेचे मंत्री भरत गोगावले यांनी केली होती. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. त्यांना कुठलंच पालकमंत्रीपद मिळालं नाही, तर नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या दादा भुसे यांनाही यातून डावलण्यात आलंयय यावर शिवसेनेकडून गुलाबराव पाटील यांनी त्याची नाराजी उघड केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
रायगड आणि नाशिकचा आग्रह धरूनही या जिल्ह्याचे पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि भाजपाच्या गिरीश महाजन यांची वर्णी लागली आहे. या नियुक्त्यांवरून महायुतीत खदखद सुरू झाली आहे. रायगडमधील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. मात्र, यात कोणताही वाद नाही, आम्ही सगळे सहकार्याने काम करू असं सांगत अदिती तटकरे यांनी यावर सारवासारव केलीय
हेही वाचा : मुंडे तुम्ही राजीनाम्याची तयारी करा; दमानियांचा हल्लाबोल
महायुतीत मंत्रिपदावरून नाराजी नाट्य रंगलं होतं. छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या नाराजीची सूर लावला होता. आता पालकमंत्रिपदावरून अनेकांची पुन्हा नाराजी रंगली आहे. महायुती सरकार बहुमतानं सत्तेवर बसलं असलं तरी त्याच्यातील खदखद सतत सुरू आहे.