कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठचे नाव अद्याप न बदलल्यामुळे कोल्हापुरातील राजकीय आणि त्यासोबतच सामाजिक क्षेत्रातील वातावरण तापले आहे. त्यामुळे, शिवाजी विद्यापीठ या शैक्षणिक संस्थेचे नाव बदलण्यास विरोध कारण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आणि शिवाजी विद्यापीठाचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मिळून बुधवारी, 26 मार्च 2025 रोजी विद्यापीठ परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.
विद्यापीठाच्या नावातील एकेरी उल्लेखामुळे वाद पेटला:
''विद्यापीठाच्या नावातील 'शिवाजी' हा एकेरी उल्लेख करणाऱ्या शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्यात यावे. कारण पदवीशिवाय फक्त पहिले नाव वापरणे हे मराठा साम्राज्याच्या संस्थापकांचे अनादर आहे'', अशी मागणी शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि त्यासोबतच, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
तर दुसऱ्या गटाने शनिवारी, 22 मार्च 2025 रोजी झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत, 'असा नामविस्तार करू नये' हा प्रस्ताव त्यांनी मांडला असून, ते मंजुरदेखील करण्यात आले आहे. या दोन्ही गटांच्या आक्रमक भूमिकेमुळे शिवाजी विद्यापीठाचे नामविस्तार प्रकरण चांगलेच तापले आहे.
हेही वाचा: प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी
'हा' आहे विद्यापीठाच्या नावाचा इतिहास:
1962 मध्ये कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हा विद्यापीठाला शिवाजी महाराजांचे नाव देण्याचे निश्चय झाले. विद्यापीठाला नाव देताना 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे लांबलचक नाव ठेवले, तर त्याचे लघुरूप होऊन त्यातील शिवाजी हा शब्द उच्चारला जाणार नाही', असा तर्क तेव्हा मांडला होता. तेव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत इतर सर्वांनी या निर्णयाला मान्यता दिली होती. त्यामुळे, विद्यापीठाचे नाव शिवाजी विद्यापीठ केले गेले.
त्यानंतर, गेल्या 50 वर्षांमध्ये राज्यातील अनेक संस्था आणि मार्गांना 'शिवाजी' असे एकेरी उल्लेख असलेले नाव बदलून त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज असे नाव ठेवण्यात आले. याच कारणामुळे, शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलून 'छत्रपती शिवाजी महाराज' असे नाव देण्याची मागणी होत आहे. सध्या कोल्हापूर शहरातील हिंदुत्त्ववादी संघटनांनी आणि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी ही मागणी केल्यामुळे हा वाद आणखी वाढला आहे.