बारामती : बारामती जिल्ह्यातील दौंड तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. वापरलेले आणि विना वापरलेले इंजेक्शन्स थेट खडकवासला कॅनॉलमध्ये टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे इंजेक्शन्स कुठल्या प्रकारची आहेत आणि ते पाण्यात कुणी टाकलेत याबाबत कुणाला काही माहिती नसल्याने त्याचा परिणाम दौंडकऱ्यांच्या जीवावर होऊ शकतो, अशी भिती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
खडकवासला कॅनॉलमध्ये इंजेक्शन्स टाकल्याचा प्रकार उघड झाला आहे. पाण्यात इंजेक्शन टाकल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अशाप्रकारे पाण्यात इंजेक्शन्स कुणी टाकले याची कुठलीही माहिती मिळाली नाही.
दौंड शहरासाठी पाणीपुरवठा होणाऱ्या खडकवासला कॅनॉलमध्ये वापरलेले आणि न वापरलेले इंजेक्शन्स सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या कॅनॉलमध्ये इंजेक्शन्स टाकणे अत्यंत वाईट आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.