Monday, September 01, 2025 09:16:55 AM

पुराच्या पाण्यातून जीवाची बाजी लावून पाच जणांचे प्राण वाचवणारा 'खाकी वर्दीतला खरा हिरो'

मंगळवारी, अहिल्यानगर येथील खडकी, खंडाळा, अकोलनेर, शिराढोण या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला होता. तसेच, नदी-नाल्यांना अचानक पूर आल्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते.

पुराच्या पाण्यातून जीवाची बाजी लावून पाच जणांचे प्राण वाचवणारा खाकी वर्दीतला खरा हिरो

अमोल दरेकर, प्रतिनिधी. अहिल्यानगर: मंगळवारी, अहिल्यानगर येथील खडकी, खंडाळा, अकोलनेर, शिराढोण या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला होता. तसेच, नदी-नाल्यांना अचानक पूर आल्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते.

हेही वाचा: उड्डाण करण्यास नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्ज

यादरम्यान, ट्रॅक्टरमधून प्रवास करणारे 5 जण पुराच्या पाण्यात अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच, क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी धाव घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी स्वतःचं जीव धोक्यात घालून दोरीच्या साहाय्याने पुराच्या पाण्यात उतरले आणि पाचही नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांच्या या धाडसी आणि माणुसकीच्या कार्याची परिसरात जोरदार प्रशंसा होत आहे. प्रतिकूल हवामान, जोरदार पावसाचा मारा, वाढता नदीप्रवाह अशा अडचणींमध्येही त्यांनी आपले कर्तव्य पार पाडत 'खाकी वर्दीतील खरा हिरो' अशी ओळख निर्माण केली आहे.

हेही वाचा: 'मयुरी हगवणे प्रकरणात पोलिसांवर कारवाई करा'; महिला आयोगाचे फडणवीसांना पत्र

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना 'रेड अलर्ट', 'यलो अलर्ट' आणि 'ऑरेंज अलर्ट' जारी केले आहेत.

यलो अलर्ट: मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नागपूर आणि इतर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

रेड अलर्ट: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.

ऑरेंज अलर्ट: पुणे, सातारा, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.


सम्बन्धित सामग्री