Sunday, August 31, 2025 06:10:36 AM

Pune: ॠषीपंचमीनिमित्त 35 हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 133 व्या वर्षी गणेशोत्सवात  ॠषीपंचमीनिमित्त 35 हजार महिलांनी अर्थवशीर्ष पठण केले आहे.

pune ॠषीपंचमीनिमित्त 35 हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण

पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 133 व्या वर्षी गणेशोत्सवात  ॠषीपंचमीनिमित्त 35 हजार महिलांनी अर्थवशीर्ष पठण केले आहे. गणशोत्सवाला बुधवारपासून सुरुवात झाली असून दुसऱ्या दिवशी पुण्यातील महिलांनी अर्थवशीर्ष पठण केले आहे. 

ॠषीपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यात 35 हजार महिलांनी सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण केले. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, पुणे विभागाच्या सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर उपस्थित होत्या. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी साजरी केली जाते. त्यामुळे आज ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांनी एकत्र येत अर्थवशीर्ष पठण केले आहे. यामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. 

हेही वाचा: Lalbaugcha Raja History: नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचा 91 वर्ष जुना इतिहास, जाणून घ्या..

ऋषी पंचमी व्रत म्हणजे काय?
ऋषीपंचमी हे एक स्वतंत्र व्रत असून ते महिलांद्वारे केले जाते. मासिक पाळीचा धर्म पाळण्यात जर काही चूक झाली असेल, तर त्याचे पाप क्षालन करण्यासाठी हे व्रत करतात. या व्रतामुळे रजोदर्शनकाळातील स्त्रीच्या वासनादेहावर व मनोदेहावर झालेले कुसंस्कार ऋषींच्या स्मरणाने नष्ट होण्यास मदत होते, असे सांगितले जाते. शास्त्रानुसार सर्व वर्गातील स्त्रियांनी हे व्रत अवश्य करावे असे ही म्हणतात.


सम्बन्धित सामग्री