Monday, September 01, 2025 12:36:17 AM

रात्रभर झालेल्या पावसामुळे मेंढ्यांचे हाल; ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत

उत्तर पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः मेंढीपालन करणाऱ्या कुटुंबांवर या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

रात्रभर झालेल्या पावसामुळे मेंढ्यांचे हाल ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत

अमोल दरेकर. प्रतिनिधी. शिरूर: सध्या राज्यभरात अवकाळी पावसाचे थैमान झाले आहे. महाराष्ट्रातील काही भागात कमी प्रमाणात पाऊस होत आहेत तर काही भागात मुसळधार पाऊस होत आहे. अशातच, उत्तर पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः मेंढीपालन करणाऱ्या कुटुंबांवर या पावसाचा मोठा फटका बसला असून, रात्रभर पडलेल्या पावसामुळे आणि झालेल्या गारठ्यामुळे मेंढ्या अक्षरशः कुडकुडून गेल्या आहेत. 

हेही वाचा: Who Is Karishma Hagawane: वैष्णवी हगवणेचा छळ करणारी नणंद करिष्मा हगवणे कोण? जाणून घ्या

अशातच, रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे, अनेक ठिकाणी या मेंढपाळांना उघड्यावरच रात्र काढावी लागली. थंडीमुळे मेंढ्यांची तब्येत खालावली असून काही मेंढ्या अंतिम घटक मोजताना दिसत आहे. त्यांच्या पोटाला खायला अन्न नाही, अंगावर झाकण्यासाठी आच्छादन नाही, आणि संरक्षणासाठी निवारा नाही. अशा त्रासदायक परिस्थितीत या मेंढपाळ कुटुंबीयांनी पावसाचा सामना केला आहे. 


सम्बन्धित सामग्री