मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि आमदार अमीन पटेल मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात कॉंग्रेसला संधी हवी आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहेत. याबद्दल उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे महत्त्वाचं आहे. कारण शिवसेनेच्या 59 वर्षाच्या इतिहासात कॉंग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंसोबत कधीच मंचावर दिसले नाही.