Monday, September 01, 2025 02:35:25 PM

ईश्वरी उर्फ तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; ससूनचे डीन करणार अहवाल सादर

तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ईश्वरी उर्फ तनिषा भिसे यांच्या मृत्यूबाबत ससूनमधील तज्ज्ञांचे अहवाल लवकरच ससून रुग्णालयाचे डीन एकनाथ पवार यांना सादर केले जातील.

ईश्वरी उर्फ तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट ससूनचे डीन करणार अहवाल सादर

पुणे: तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ईश्वरी उर्फ तनिषा भिसे यांच्या मृत्यूबाबत ससूनमधील तज्ज्ञांचे अहवाल लवकरच ससून रुग्णालयाचे डीन एकनाथ पवार यांना सादर केले जातील. त्यानंतर, ससून डीन एकनाथ पवार बुधवारी हा अहवाल सरकारला पाठवतील. बुधवारी हा अहवाल राज्य सरकारला सीलबंद लिफाफ्याद्वारे पाठवला जाईल.

तज्ज्ञ समितीमार्फत ससून रुग्णालयात बैठक

ससूनच्या ६ वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने रात्री उशिरा हा अहवाल तयार केला होता. मंगळवारी पुण्यातील ससून रुग्णालयात दिवसभर या तज्ज्ञ समितीमार्फत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ईश्वरी उर्फ तनिषा भिसे यांच्या मृत्यूची जबाबदारी नेमकी कुणाची आहे, यावर चर्चा झाली. या समितीच्या निष्कर्षाचा अहवाल अलंकार पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. सध्या या प्रकरणावर पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे.

या समितीत ससूनचे वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोग विभागाचे प्रमुख, फार्मसी विभागाचे प्रमुख, फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख, भूलशास्त्र विभागाचे प्रमुख आणि बालरोग विभागाचे प्रमुख या सहा जणांचा समावेश होता. या तज्ज्ञांनी तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील सर्व पैलू तपासले आहेत. तज्ज्ञ समितीने दीनानाथ हॉस्पिटल, सूर्या हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल आणि इंदिरा आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटर यांनी दाखल केलेल्या उत्तरांची देखील तपासणी केली आहे.

मात्र, अशा परिस्थितीत पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डिपॉजिटचा मुद्दा चर्चेचा विषय असतानाच, काही रुग्णालयांनी धर्मादाय कायद्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरात पुण्यातील 58 पैकी 12 धर्मादाय रुग्णालयांनी एकही गरिब रूग्ण सवलतीच्या दरात उपचारासाठी घेतले नाहीत. त्यामुळे आता या रुग्णालयांवर पालिकेने काय कारवाई केली, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


सम्बन्धित सामग्री