Thursday, September 04, 2025 06:05:26 PM

नाशकात तणाव; दर्ग्यावर कारवाई

नाशिकमध्ये नाशिक महानगरपालिकेने सर्व अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईचा बडगा उगारलाय. यामुळे नाशिकमध्ये तणावाचे वातावरण झाल्याचं पाहायला मिळतंय.

नाशकात तणाव दर्ग्यावर कारवाई

नाशिक: नाशिकमध्ये नाशिक महानगरपालिकेने सर्व अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईचा बडगा उगारलाय. यामुळे नाशिकमध्ये तणावाचे वातावरण झाल्याचं पाहायला मिळतंय. नाशिक-पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरातील एका धार्मिक स्थळावर पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आलीय. परंतु नाशिकमध्ये आता तणावाचे वातावरण पाहायला मिळतंय. नाशिक-पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरातील एका धार्मिक स्थळावर पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आलीय. पण त्यावेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता. शेकडो नागरिक काठे गल्ली परिसरात दाखल झाले होते यावेळी येथे जमलेला जमाव काही प्रमाणात आक्रमक झालीच देखील पाहायला मिळालं. या आक्रमक जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांकडून अनेकांना ताब्यात देखील घेण्यात आलंय. 

 ST Bus travel concession : प्रताप सरनाईकांचं वक्तव्य; एकनाथ शिंदेंचा पूर्णविराम

नाशिकमधील द्वारका त्याच बरोबर काठे गल्ली म्हणजे वर्दळीचे ठिकाण आहे. यामुळेच नाशिक-पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरातील एका धार्मिक स्थळावर कारवाई करतांना पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचबरोब धार्मिक स्थळाच्या वादातून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीपासूनच नाशिक-पुणे महामार्गावर काठे गल्ली ते द्वारकाच्या आसपासच्या सर्व परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला. 

दरम्यान नाशिक महानगरपालिकेने सर्व अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईचा बडगा उगारल्याने परिसरात तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान अनधिकृत धार्मिक स्थळ न हटवल्यास सकल हिंदू समाजाने आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यामुळे आता हे प्रकरण नक्की काय वळण घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणारे. 


सम्बन्धित सामग्री