Sunday, August 31, 2025 01:49:06 PM

पुण्यातील ससून रुग्णालायात 1 लाख रुपयांची लाच घेताना दोन अधिकारी ताब्यात

पुण्यातील ससून रुग्णालायात 1 लाख रुपयांची लाच घेताना दोन अधिकारी ताब्यात

पुण्यातील ससून रुग्णालय येथे होणारा गैरप्रकार नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र, आता याच रुग्णालयात पुन्हा एक गैरप्रकाराची चर्चा रंगत आहे. या रुग्णालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. त्यामुळे पुण्यातील ससून रुग्णालय सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये एक वरिष्ठ सहाय्यक आणि एक कार्यालयीन अधीक्षक यांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

हेही वाचा: सत्ताधारी आमदाराचा पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप

एसीबीने रचला डाव:

ससून रुग्णालयासोबत असलेल्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (ACB) बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे आणि वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी यांना एक लाख रुपयांची लाच घेताना पकडले. या अधिकाऱ्यांनी महाविद्यालयाच्या फर्निचर पुरवठादाराकडे एक लाख रुपयांची लाच देण्याची मागणी केली होती. मात्र, लाचलुचपत प्रतिबंध विभागाला (ACB) या घटनेबद्दलची माहिती मिळाली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (ACB) सापळा रचला आणि या दोन अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले.

मागील काही प्रकारांमुळे बी. जे. मेडिकल कॉलेज चर्चेत:

यापूर्वी, ड्रग्ज माफिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ललित पाटीलदेखील याच ससून रुग्णालयातून पळून गेला होता. या घटनेनंतर, पुणे पोलीस आणि प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीकेचा वर्षाव झाला होता. या प्रकरणी, त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली होती. मात्र, तरीसुद्धा आरोपी पळून जाण्याची घटना काही थांबायचं नाव घेत नाही. आता तर पोलिसांच्या नजरेखाली उपचार सुरु असतानादेखील गंभीर गुन्ह्यातील आरोपी ससून रुग्णालयातून फरार होत असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच, पुण्यातील गाजलेल्या अपघातांपैकी एक ओळखल्या जाणाऱ्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्ताचे नमुनेदेखील याच ससून रुग्णालयात बदलले होते. मात्र, आता पुन्हा एकदा ससून रुग्णालय आणि बी. जे. मेडिकल कॉलेज पुन्हा चर्चेत आले आहे.


सम्बन्धित सामग्री