Sunday, August 31, 2025 09:29:18 AM

फडणवीसांची शिंदेंनी सरकारमध्ये रहावं म्हणून विनंती

राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं की मी स्वतः...

फडणवीसांची शिंदेंनी सरकारमध्ये रहावं म्हणून विनंती

मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांनंतर सर्वांच्या नजरा मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार यावर लागल्या होत्या. आखेर, अफाट श्रमानंतर भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी सर्वानुमते निवड केली. राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली ज्यात एकनाथ शिंदे, अजित पवार आणि स्वतः देवेंद्र फडणवीस हजर होते. या पत्रकार परिषदे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं की मी स्वतः एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली आणि त्याचबरोबर त्यांनी सगळ्यांसोबत सरकारमध्ये रहावं अशी विनंतीही केली. असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य केलं त्याचबरोबर, एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये राहावं, अशी ईच्छा फक्त माझीच नाही तर  शिवसेना आमदारांसहित महायुतीच्या आमदारांची देखील आहे. आणि, मला पूर्ण विश्वास आहे की, ते आमच्या सरकारमध्ये असतील", असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलंय. 

त्याचबरोबर, लोकांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकार काम करेल  मागील अडिच वर्षात एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मी असं तिघांनी एकत्रितपणे निर्णय घेतले आहेत. आज देखील आम्हाला हे पद तांत्रिक बाब आहे. इतर आमच्या मित्र पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातील लोकांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी प्राणपणाने हे सरकार काम करेलं. मी एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. त्यांनी मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी, असं पत्र दिलेलं आहे.  अजित पवार आणि इतर पक्षांनीही पत्र दिलेलं आहे. मी सर्वांचं आभार मानतो. रामदास आठवले यांचेही मी आभार मानतो. असं देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. 


सम्बन्धित सामग्री