मुंबई: देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात तीन- तीन महिला आमदारांना लॉटरी यात पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांची नावे आहेत. तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांच्या नावांचा समावेश मंत्रीमंडळामध्ये करण्यात आला आहे.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत "लाडकी बहीण" योजनेचा मोठा प्रभाव दिसून आणला आहे. या योजनेचा लाभ महिलांना दिला गेला, आणि त्याचा परिणाम म्हणून महायुतीतील महिला आमदारांची संख्या वाढली. महायुतीच्या २० महिला आमदारांपैकी ४ महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. भाजपाकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ यांची नावे चर्चेत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे यांचे नाव प्रमुख आहे.
याआधी महायुतीच्या सरकारमध्ये एकच महिला मंत्री होती, पण यावेळी महिला मंत्रीसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या १४ महिला आमदारांपैकी १० फेरनिवडून आलेल्या आहेत, ज्यात श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे आणि अन्य महिला आमदारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटातील महिलाही या यादीत आहेत, ज्यात सुलभा खोडके, सरोज अहिरे, मंजुळा गावित आणि संजना जाधव यांचा समावेश आहे.