मुंबई : शिवसेना नेते मिलिंद देवरा यांनी जनता संवाद कार्यक्रम घेतला. मिलिंद देवरा यांनी घेतलेला जनता संवाद कार्यक्रम लाभदायक आहे अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसारखं जमिनीवर येऊन काम करण्याचा प्रयत्न आहे. जनतेशी संवाद केल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
शिवसेना नेते मिलिंद देवरा यांनी जनता संवाद आयोजित केला आहे. जनतेचं प्रश्न तेव्हाच कळतात जेव्हा संवाद होतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे जमिनीवर जाऊन काम करतात तसंच आम्ही करत आहोत. मुंबई वाढत आहे. ज्या पद्धतीने कामाचा वेग सुरु आहे. बांधकाम सुरू आहेत. याच कामावरून चर्चा झाली. तसेच कोस्टल रोडमध्ये ओपन स्पेस पाहतो. त्यात गार्डन असणार आहेत का आणखी काय असणार आहे यावर चर्चा झाली. जनतेशी संवाद केल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत असे सिद्धेश कदम यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी जनतेला अभिनंदन करतो असेही म्हटले आहे.
हेही वाचा : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर; प्रत्यक्षदर्शीने A to Z सगळंच सांगितलं
'उबाठाने राजकीय प्रदूषण सुरू केलं'
मला खूप आनंद होत आहे. मुंबई आणि दक्षिण मुंबईमधील रहिवाश्यांसोबत संवाद वाढवण्यासाठी आपण भेटलो. प्रियदर्शनी पार्क आणि सुशिबेन शाह यांचे आभारी असल्याचे मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे. तसेच सिद्धेश कदमसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण आहे. यामध्ये येणाऱ्या काळात नक्कीच तुम्हाला बदल दिसेल. मुंबईचे रहिवासी आणि राजकीय नेते यांचा एकमेकांसोबतचा संवाद वाढवण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. वायू प्रदूषणाची समस्या आहे. ती समस्या दूर होईल. येत्या काही दिवसांत उबाठाने जे काही राजकीय प्रदूषण सुरु केलं आहे. त्याला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनता उत्तर देत असल्याचे शिवसेनेच्या मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे.