Thursday, September 18, 2025 05:39:43 PM

ICC ODI Ranking: आयसीसी T20 क्रमवारीत वरुण चक्रवर्ती अव्वल; तर महिला क्रमवारीत स्मृती मानधनाचा विजयी

जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोईनंतर हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे ज्याने टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

icc odi ranking आयसीसी t20 क्रमवारीत वरुण चक्रवर्ती अव्वल तर महिला क्रमवारीत स्मृती मानधनाचा विजयी

ICC ODI Ranking: भारतीय क्रिकेटबाबत अत्यंत कौतुकास्पद बातमी समोर येत आहे. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने आयसीसी पुरुष टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत प्रथमच नंबर 1 स्थान मिळवले आहे. जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोईनंतर हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे ज्याने टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. वरुणने आशिया कप 2025 मध्येही भारतासाठी दमदार कामगिरी केली असून, यूएईविरुद्ध 1/4 आणि पाकिस्तानविरुद्ध 1/24 विकेट्स घेतल्या आहेत. 

आयसीसीच्या निवेदनानुसार, '2025 मध्ये वरुण चक्रवर्तीच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे बक्षीस म्हणून त्याला पुरुष टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत नंबर 1 गोलंदाज बनवण्यात आले आहे.' वरुणच्या कामगिरीमुळे अन्य भारतीय गोलंदाजांनाही फायदा झाला आहे. कुलदीप यादव 16 स्थानांनी झेप घेऊन 23 व्या स्थानावर पोहोचला, अक्षर पटेल 12 व्या स्थानावर, तर जसप्रीत बुमराह चार स्थानांनी वर पोहोचून 40 व्या स्थानावर आला.

हेही वाचा - World Athletics Championships 2025: जागतिक अ‍ॅथलेटिक्स भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राला मोठं यश; पहिल्याच प्रयत्नात गाठली अंतिम फेरी

स्मृती मानधन महिला क्रमवारीत अव्वल

दरम्यान, महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीत, स्टार भारतीय फलंदाज स्मृती मानधनाने आपले नंबर 1 स्थान कायम राखले आहे. 34 वर्षीय मानधनाने पहिल्यांदा 2019 मध्ये एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते आणि आता 2025 मध्ये ती पुन्हा अव्वल स्थानावर पोहोचली आहे. 

हेही वाचा - IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला दुसरी वनडे : मंधानाची दमदार खेळी, भारताची स्थिर सुरुवात

या क्रमवारीत रिचा घोष 36 व्या, प्रतिका रावल 42 व्या, तर हरलीन देओल 43 व्या स्थानावर राहिल्या आहेत. वरुण चक्रवर्ती आणि स्मृती मानधनाच्या या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटला पुन्हा एकदा जागतिक स्तरावर मान मिळाला आहे. 


सम्बन्धित सामग्री