Sunday, August 31, 2025 05:48:28 PM

अब्जाधीश एलोन मस्क बनले 14 व्या मुलाचे बाप, शिवॉन झिलिससह गुपचुपपणे केले बाळाचे स्वागत

अब्जाधीश एलोन मस्क आणि न्यूरालिंकच्या विशेष प्रकल्प संचालक शिवोन झिलिस यांनी त्यांच्या तिसऱ्या मुलाचे स्वागत केले आहे. दोघांनीही याबद्दल सार्वजनिकपणे काहीही न बोलता ते गुपित ठेवले होते.

अब्जाधीश एलोन मस्क बनले 14 व्या मुलाचे बाप शिवॉन झिलिससह गुपचुपपणे केले बाळाचे स्वागत

न्यूयॉर्क: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले एलोन मस्क त्यांच्या 14 व्या मुलाचे बाप बनले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी न्यूरालिंकच्या कार्यकारी अधिकारी शिवोन झिलिस यांच्यासोबत त्यांच्या चौथ्या मुलाचे स्वागत केले. दोघेही आधीच जुळ्या मुलांचे पालक आहेत. यानंतर 2024 च्या सुरुवातीला त्यांना एक मुलगी झाली होती. मात्र, हे त्यांनी जगापासून गुपित ठेवले होते. आता चौथ्या मुलाच्या जन्माच्या घोषणेसह त्यांनी तिसऱ्या मुलीचाही मागील वर्षी जन्म झाल्याचे सांगितले. 2021 मध्ये मस्क यांनी झिलिससोबत स्ट्रायडर आणि अझ्युर या जुळ्या मुलांचे स्वागत केले. या जोडप्याने त्यांच्या कुटुंबातील या नवीन सदस्याबद्दल सार्वजनिक घोषणा केलेली नव्हती.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, टेस्लाचे सीईओ 52 वर्षीय एलोन मस्क यांनी 2021 मध्ये त्यांच्या ब्रेन-चिप इम्प्लांट कंपनी न्यूरालिंकच्या 38 वर्षीय संचालक शिवोन झिलिस यांच्यासोबत जुळ्या मुलांचे स्वागत केले. त्यांनी 2022 मध्ये ही माहिती दिली होती. मस्क आणि शिवोन झिलिस यांचे तिसरे अपत्य असलेल्या मुलीचं नाव अर्काडिया आहे. तिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांचे चौथे अपत्य मुलगा असून त्याचे नाव सेल्डन लायकर्गस ठेवल्याचे सांगितले.

हेही वाचा - Bengaluru: कुंपणानेच शेत खाल्लं तर..? 17वर्षीय बलात्कार पीडिता तक्रार नोंदवायला गेली.. पण पोलिसानेच पुन्हा केला बलात्कार

मस्क गेल्या पाच वर्षांत सहा मुलांचे बाप बनले
एलोन मस्क आता 14 मुलांचे वडील आहेत, त्यापैकी सहा मुलांचे त्यांनी गेल्या पाच वर्षांत स्वागत केले आहे. त्यांनी अलीकडेच स्वागत केलेल्या सहा मुलांपैकी तिघांना जन्म देणारी आई त्यांची माजी जोडीदार, कॅनेडियन पॉपस्टार ग्रिम्स आहे. मस्क यांना त्यांची पहिली पत्नी, लेखिका जस्टिन विल्सन हिच्यापासून जुळी आणि तिळी अशी मिळून पाच मुले आहेत. 2002 मध्ये त्यांना पहिली पत्नी जस्टीन हिच्याकडून नेवाडा अलेक्झांडर मस्क हा मुलगा झाला होता. मात्र त्याचे निधन झाले. त्यानंतर आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे त्यांना जुळी आणि तिळी मुले झाली. त्यानंतर संगीतकार ग्रिम्स यांच्याकडून त्यांना तीन मुले झाली.

टेस्ला कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांनी आतापर्यंत 12 मुलांना जन्म दिल्याचे बोलले जात होते. त्यापैकी शिवोन झिलीस यांनी आता तिसऱ्या आणि चौथ्या बाळाची माहिती दिली आहे. याआधी त्यांना दोन जुळी मुले आहेत.

काही दिवसांपूर्वी एन्फ्लुएन्सर अ‍ॅशले सेंट क्लेअर पाच महिन्यांपूर्वी मस्क यांच्या बाळाला जन्म दिल्याचा दावा केला. क्लेअरची एक्स पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल झाली होती. तसेच, मस्क यांची जोडीदार ग्रिम्स यांनी त्यांच्या मुलाच्या वैद्यकीय गरजांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला होता.

मस्क यांची पहिली पत्नी जस्टीन विल्सन हिच्याकडून झालेल्या पहिल्या मुलाचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त मस्क यांची आता एकूण 13 मुले आहेत.

हेही वाचा - Mahakumbh Mela 2025 : 'आई कुंभमेळ्यात हरवली', हे ऐकताच मुलगा थेट पोहोचला प्रयागराजला; अन् बापाचं भयंकर कृत्य उघडकीस!

एलोन मस्क त्यांच्या मुलांमुळे अनेकदा चर्चेत असतात. काही काळापूर्वी, मुलांबद्दल विचारलेल्या एका प्रश्नावर, एलोन म्हणाले की, जग लोकसंख्या संकटाचा सामना करत आहे. अशाप्रकारे, ते जगाला लोकसंख्या संकटावर मात करण्यास मदत करत आहे. यावर झिलिस म्हणाल्या होत्या की मस्क यांनीच त्यांना मुले होण्यासाठी प्रोत्साहित केले होते.

टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, 19 जून 2024 रोजी एलोन मस्क यांची एकूण संपत्ती 210 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. यासह ते जगातील सर्वाधिक श्रीमंतांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. मस्क यांची संपत्ती अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्यापेक्षा सुमारे तीन अब्ज डॉलर्सने जास्त आहे.


सम्बन्धित सामग्री