Sunday, August 31, 2025 08:55:53 AM

Donald Trump On Tariff :टॅरिफबाबत ट्रम्प घेणार नवीन निर्णय! अनेक देशांना फटका बसणार; जाणून घ्या

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत चर्चेत असतात. अशातच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

donald trump on tariff टॅरिफबाबत ट्रम्प घेणार नवीन निर्णय अनेक देशांना फटका बसणार जाणून घ्या

नवी दिल्ली: नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, मात्र, आता ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एवढ्यावरच न थांबता टॅरिफच्या अटी मान्य करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दबाव टाकला जात आहे आणि अक्षरक्ष: खालच्या पातळीवर जाऊन भारतावर टीका करण्यासही सुरूवात केली आहे. अशातच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. 

आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फर्निचर आयातीवरही टॅरिफ लावण्याचा तयारीत आहे, तसा प्रस्तावही त्यांच्यावतीने ठेवण्यात आला आहे. पुढील 50 दिवस यावर चर्चा आणि बैठका घेतल्या जातील, त्यानंतर, हा निर्णय होणार आहे. अमेरिकेत येणाऱ्या फर्निचरवर नेमका किती टॅरिफ लावायचा याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे, जो देश अमेरिकेला फर्नचर निर्यात करत त्यांना मोठा फटका बसणार आहे. 

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

या निर्णयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, 'मला विश्वास आहे की, माझ्या या निर्णयामुळे अमेरिका देशाचा उद्योग पुन्हा एकदा मजबूत होईल आणि देशात उत्पादन वाढेल. टॅरिफचा निर्णय घेतल्याने बाहेरील देशांचे फर्निचर अमेरिकेत कमी प्रमाणात येतील आणि बाजारपेठेत अमेरिकन कंपन्यांच्या मालाची मागणी दुपटीने वाढेल'. विशेषत: ट्रम्प यांच्या घोषणेनंतर त्याचा परिणाम अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये दिसत आहे.


सम्बन्धित सामग्री