केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट 2025 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) साठी ₹19,794 कोटींची तरतूद जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये तब्बल 36% वाढ करण्यात आली आहे. विशेषतः PMAY-शहरी योजनेसाठी ही वाढ झाल्यामुळे शहरांमध्ये परवडणाऱ्या घरांच्या संधी वाढणार आहेत.
2015 साली सुरू झालेली ही योजना मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवारासाठी परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. “2022 पर्यंत सर्वांसाठी घरे” या उद्दिष्टाने सुरू झालेली योजना अजूनही पूर्णतः साध्य झालेली नाही, मात्र सरकारने तिची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
बजेट 2025 चा बाजारावर काय परिणाम होणार ?
गेल्या काही वर्षांतील PMAY चा अर्थसंकल्प
बजेटमध्ये वेळोवेळी या योजनेसाठी वाढीव निधी दिला जात आहे. 2022-23 मध्ये ₹48,000 कोटींची तरतूद होती, तर 2023-24 मध्ये ₹79,590 कोटींवर ती पोहोचली. मात्र, प्रत्यक्ष खर्च ₹54,103 कोटींचा झाला. यावर्षी ₹84,671 कोटींच्या अंदाजपत्रकासह सरकारने अधिक घरे उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला आहे.
Union Budget 2025: अर्थसंकल्पातून पगारदारांना दिलासा
PMAY-ग्रामीण योजनेसाठीही महत्त्वपूर्ण निर्णय
2016 मध्ये सुरू झालेल्या ग्रामीण आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत 3.23 कोटी घरे मंजूर झाली असून 2.69 कोटी घरे पूर्ण झाली आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू कुटुंबांना या योजनेचा मोठा फायदा होतोय.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये या योजनेला विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी ही योजना मोठी संधी ठरणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.