मुंबई : एनडीएमधून महिला कॅडेट्सची पहिली तुकडी उत्तीर्ण होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट्स 300 हून अधिक पुरुषांसह एनडीएमधून ग्रॅज्यूएट होतील. 148 व्या कोर्सची पासिंग आउट परेड शुक्रवारी म्हणजे 30 मे रोजी होणार आहे.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधून महिला कॅडेट्सची पहिली तुकडी उत्तीर्ण होणार आहे. 148व्या कोर्सची पासिंग आउट परेड शुक्रवारी म्हणजे 30 मे रोजी होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट्स 300 हून अधिक पुरुषांसह एनडीएमधून ग्रॅज्यूएट होतील. त्या भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात सामील होतील.
2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महिलांना एनडीए परीक्षा देण्याची परवानगी देण्याचा आदेश दिला होता. यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने महिलांना अर्ज करण्याची परवानगी दिली. 2022 मध्ये पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट्सची तुकडी एनडीएमध्ये सामील झाली. यापैकी काही महिला कॅडेट्सनी एनडीएमधील त्यांच्या तीन वर्षांच्या प्रवासाबद्दलचे अनुभव शेअर केले.
हेही वाचा : पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला नागपुरात आणलं
हरसिमरन कौर म्हणाल्या, 'मी सशस्त्र दलाच्या पार्श्वभूमीतून आले आहे. माझे वडील भारतीय सैन्यातून हवालदार पदावरून निवृत्त झाले. माझे आजोबाही सैन्यात होते, त्यामुळे माझे संरक्षणाशी खोलवरचे नाते आहे. मला संरक्षण क्षेत्रात लवकर करिअर सुरू करायचे होते, म्हणून मी एनडीए निवडले.
हम भी हैं जोश में
भारतीय सैन्यात 12 लाख पुरुषांच्या तुलनेत 7 हजार महिला आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण फक्त 0.56 टक्के आहे. हवाई दलात सुमारे 1.5 लाख जवान आहेत. महिलांची संख्या फक्त 1600 आहे. येथे हे प्रमाण 1 टक्क्यांपेक्षा थोडे जास्त आहे. भारतीय नौदलात पुरुषांची संख्या दहा हजार आहे. तर महिलांची संख्या फक्त 700 आहे. या दलात महिलांचे प्रमाण 6.5 टक्के आहे.
महिला ब्रिगेड
तिन्ही दलांमध्ये एकूण 9118 महिला अधिकारी आहेत. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये भारताच्या तिन्ही सैन्यात महिलांची संख्या वाढली. भारतात, महिला लढाऊ विमाने उडवण्यात आणि समुद्रात लष्करी जहाजांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तसेच विशेष ऑपरेशन्सद्वारे शत्रूला धडा शिकवत आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण हे पाहिले आहे. यात आता एनडीएत पास झालेल्या या नव्या 17 महिला कॅडेट्स भारतीय सैन्याची सेवा करण्यास सज्ज झाल्या आहेत. त्यांना जय महाराष्ट्रतर्फे खूप खूप शुभेच्छा.