मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कोट्यवधी भारतीयांना मोठा दिलासा दिला आहे. गृहकर्ज, वाहन कर्ज तसेच वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या नागरिकांसाठी ही बातमी खऱ्या अर्थानं आनंदाची आहे. पतधोरण समितीच्या ताज्या बैठकीत रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची (0.25%) कपात करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, यामुळे रेपो रेट आता 6.25 टक्क्यांवरून थेट 6 टक्क्यांवर आला आहे. या निर्णयामुळे बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या व्याजदरांमध्ये कपात होण्याची शक्यता असून, सर्वसामान्यांचा मासिक हप्ता म्हणजेच ईएमआय आता अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी हा निर्णय म्हणजे मोठा श्वास घेतल्यासारखा दिलासा देणारा आहे.
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट हा रिझर्व्ह बँकेकडून इतर बँकांना दिल्या जाणाऱ्या अल्पकालीन कर्जावरील व्याजदर असतो. जेव्हा रेपो रेट कमी होतो, तेव्हा बँका कमी दरात पैसे उधार घेऊ शकतात. परिणामी, त्या देखील ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देऊ शकतात. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज व वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांना प्रत्यक्ष फायदा होतो.
संजय मल्होत्रांच्या नेतृत्वाखाली सलग दुसरा दिलासा:
आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सलग दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात करून ग्राहकांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जागतिक स्तरावर टॅरिफ वॉर आणि आर्थिक अस्थिरतेची पार्श्वभूमी असतानाही भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) यांनी आर्थिक स्थिरतेचा विचार करत ही पावले उचलली आहेत.
कर्ज घेणाऱ्यांना काय फायदा होणार?
गृहकर्जाच्या ईएमआयमध्ये कपामध्ये 50 लाखांच्या कर्जासाठी दरमहा काही रुपयांची बचत होणार.
वाहन कर्ज अधिक परवडणारे: गाड्या घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी.
व्यक्तिगत कर्ज अधिक सुलभ: कमी व्याजदरामुळे कर्ज फेडणे सोपे होईल.
बाजारावर सकारात्मक परिणाम:
या निर्णयामुळे शेअर बाजारातही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. बँकिंग आणि हाउसिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ दिसून आली आहे. आर्थिक गतीमानतेस चालना देण्यासाठी अशा प्रकारच्या धोरणात्मक निर्णयांची गरज होती, जी आता पावले उचलण्यात आली आहे.