Wednesday, September 03, 2025 01:19:20 PM

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी

नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेत 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक प्रवासी जखमी आहेत. महाकुंभला जाणाऱ्या 2 गाड्या उशिरा आल्याने गर्दी वाढली आणि त्यामुळेच चेंगराचेंगरी झाली. 

कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झाली होती. या गर्दीमुळे प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 3 मुलांसह 18 जणांचा मृत्यू  झाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर चेंगराचेंगरी पाहायला मिळाली आहे. 

हेही वाचा : धस यांच्या भेटीला राजकीय संशयाचं वलय; विरोधकांकडून जोरदार निशाणा
 

नवी दिल्ली रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर आले. यामुळे हा गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  

नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून कुंभमेळ्यासाठी 2 स्पेशल ट्रेन चालवल्या जात होत्या. शनिवारनंतर रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने शेकडो लोक कुंभस्नानासाठी प्रयागराजला निघाले होते. नवी दिल्ली स्थानकातही खूप गर्दी झाली होती. मात्र, आधीपासून तिकिट बुक असल्याने प्रवाशांनी जनरल कोचचे तिकीट काढलं आणि प्लॅटफॉर्म नंबर 14-15 नंबरवर उभे होते. तिथूनच प्रयागराजला जाणारी ट्रेन येणार होती. स्वतंत्रता सेनानी एक्स्प्रेस आणि भुबनेश्वर एक्स्प्रेस ट्रेन उशिराने धावत होती. ज्यामुळे त्याचे प्रवाशीदेखील प्लॅटफॉर्म नंबर 12-13 वर ट्रेनची वाट पाहत थांबले होते. त्यामुळेच प्लॅटफॉर्मपासून ते जिन्यांपर्यंत प्रवाशांची गर्दी जमली होती. रात्री साधारण नऊ वाजण्याच्या दरम्यान प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 15वर आली होती. ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची एकच धावपळ सुरू झाली. याच धावपळीत पायऱ्यांवर उभे असलेले लोक खाली पडले. 

चेंगराचेंगरी कशी झाली?

शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली
चेंगराचेंगरीत 3 मुलांसह 18 जणांचा मृत्यू  
नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून कुंभमेळ्यासाठी 2 स्पेशल ट्रेन चालवल्या जात होत्या
वीकेंड असल्यानं शेकडो भाविक कुंभस्नानासाठी प्रयागराजला निघाले होते
स्वतंत्रता सेनानी एक्स्प्रेस आणि भुबनेश्वर एक्स्प्रेस ट्रेन उशीराने धावत होती
प्रवाशी प्लॅटफॉर्म नंबर 12-13 वर ट्रेनची वाट पाहत थांबले होते
महाकुंभला जाणारी एक ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली 
ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची एकच धावपळ सुरू झाली
यावेळी धावपळीत पायऱ्यांवर उभे असलेले लोक खाली पडले
 ट्रेन पकडण्यासाठी प्रमाणाबाहेर गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी
गर्दी जास्त वाढल्यानं गुदरमरुन अनेक प्रवासी बेशुद्ध 
एकमेकांवर प्रवाशी पडल्याने महिला आणि मुलांना सर्वाधिक त्रास
9 महिला,  4 मुलं आणि 5 पुरुष प्रवाशांचा मृतांमध्ये समावेश 


 


सम्बन्धित सामग्री