Wednesday, September 10, 2025 08:09:41 PM

Cyber Fraud Case : 'अंतराळ यानात अडकलोय! ऑक्सिजन विकत घेण्यासाठी लवकर पैसे पाठव..' भामट्याने उकळले इतके लाख

त्या भामट्याने वृद्ध महिलेला सांगितले की, तो पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अंतराळयानात बसला आहे. त्याने लवकरच तिला खात्री पटवून दिली की, त्याच्या अंतराळयानावर हल्ला झाला आहे आणि ऑक्सिजन संपत आहे.

cyber fraud case  अंतराळ यानात अडकलोय ऑक्सिजन विकत घेण्यासाठी लवकर पैसे पाठव भामट्याने उकळले इतके लाख

Cyber Fraud Case : तंत्रज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे घोटाळेही वाढू लागले आहेत. सायबर फसवणुकीच्या घटना दररोज ऐकायला मिळत आहेत. जपानमध्ये एका महिलेसोबत एक विचित्र घोटाळ्याची घटना समोर आली आहे. यामध्ये, अंतराळवीर असल्याचा दावा करणाऱ्या पुरुषाने या महिलेला असे सांगितले की, तो एका अंतराळयानात अडकला आहे आणि त्याच्यावर हल्ला झाला आहे. त्याच्या जवळचा ऑक्सिजन संपत आला आहे. अशा परिस्थितीत, त्याला ऑक्सिजन खरेदी करण्यासाठी त्वरित पैशांची आवश्यकता आहे. महिलेने त्या माणसावर विश्वास ठेवला आणि पैसेही पाठवले. परंतु, नंतर तिला समजले की, कोणीतरी तिची फसवणूक केली आहे.

हेही वाचा - OMG! हा माणूस चक्क 6 वेळा मेला आणि परत जिवंत झाला! लोक काय म्हणाले माहीत आहे..?

वृत्तानुसार, वृद्ध जपानी महिला पेन्शनर आहे. एका सोपोरो सोशल मीडियावर त्या या माणसाला भेटली. येथे त्याने तिला सांगितले की, तो पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अंतराळयानात बसला होता. त्याने त्या महिलेला खात्री पटवून दिली की, त्याच्या अंतराळयानावर हल्ला झाला आहे आणि ऑक्सिजन संपत आहे. त्या पुरूषाने त्या महिलेला 10 लाख येन (सुमारे सहा लाख रुपये) इलेक्ट्रॉनिक चलन खरेदी करण्याची आणि ते त्याला देण्याची विनंती केली. जेणेकरून, तो अधिक ऑक्सिजन खरेदी करू शकेल. तिला मिळत असलेल्या  पेन्शनमधील पैसे तिने त्याला दिले.

तपासात असे दिसून आले आहे की, सोशल मीडियावर महिला आणि पुरूष यांच्यातील संभाषणातून असे दिसून आले आहे की, महिलेला त्या पुरूषाबद्दल आकर्षणाची भावना निर्माण झाली होती. सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी महिलेबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, हे खूप हास्यास्पद वाटते आणि तिच्यावर टीका करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. परंतु, वाईट गोष्ट म्हणजे, बरेच लोक अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि त्यांची फसवणूक होते. दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले की, ही विनोदी गोष्ट नाही. असे म्हटले जाते, की प्रेम आंधळे असते. परंतु, येथे ते खूपच आंधळे झाले आहे.

हेही वाचा - Reddit Post Viral : भावाच्या लग्नासाठी मागितली रजा; बॉसनं घातली ही अट, तिला निवड करणं झालं कठीण, वाचा सविस्तर


सम्बन्धित सामग्री