२४ सप्टेंबर, २०२४, मुंबई : अक्षय शिंदेचा मृत्यू अती रक्तस्त्रावाने झाल्याचं उघड झालं आहे. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं कारण उघड झालं आहे. अक्षयच्या डोक्याला गोळी लागल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांना सुपूर्द करण्यात आला आहे. सात तास शवविच्छेदन सुरू होतं. या संपूर्ण शवविच्छेदन प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे. पाच डॉक्टरच्या पॅनलने शवविच्छेदन केलं आहे. मात्र शिंदे कुटुंबाने अक्षयचा मृतदेह नाकारला आहे.