Sunday, August 31, 2025 11:54:16 AM

पाकिस्तानमधील पोलीस ठाण्यात स्फोट

पाकिस्तानच्या वायव्य भागातल्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वाबी जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्यात स्फोट झाला.

पाकिस्तानमधील पोलीस ठाण्यात स्फोट

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या वायव्य भागातल्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वाबी जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्यात स्फोट झाला. या स्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला आणि २५ पोलीस जखमी झाले. पोलीस मुख्यालयाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलीस ठाण्यातील शस्त्र ठेवण्याच्या विभागात शॉर्ट सर्किट झाले. यानंतर स्फोट झाला. स्फोटामुळे आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक आणि जवळच्या सरकारी रुग्णालयाचे पथक घटनास्थळी पोहोचले. मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना बाचा खान रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री