Sunday, August 31, 2025 02:20:14 PM

बदलापूर प्रकरणी फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला.

बदलापूर प्रकरणी फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. पण संस्थाचालक आणि सचिव अद्याप फरार आहेत. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले. 

आरोपी तुषार आपटे आणि उदय कोतवाल गुन्हा दाखल होण्याआधीच फरार झाले. घटनेला एक महिना उलटून गेला तरी दोन्ही आरोपींचा ठावठिकाणा सापडलेला नाही. या पार्श्वभूमीवर आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्याची पोलीस वाट बघत आहेत का ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला. या प्रकरणी पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे. 


सम्बन्धित सामग्री