Thursday, August 21, 2025 12:17:23 PM

काँग्रेसने रोखली अनधिकृत मशिदीवरील महापालिकेची कारवाई

धारावी परिसरातील एका मशिदीचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी आलेल्या मुंबई महापालिकेच्या पथकाची मुसलमानांनी अडवणूक केली.

काँग्रेसने रोखली अनधिकृत मशिदीवरील महापालिकेची कारवाई

मुंबई : धारावी परिसरातील एका मशिदीचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी आलेल्या मुंबई महापालिकेच्या पथकाची मुसलमानांनी अडवणूक केली. काँग्रेसने मुसलमानांना साथ देत महापालिकेला कारवाई स्थगित करण्यास सांगितले. यापर्संगी शेकडो मुसलमान रस्त्यावर आल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. काँग्रेस नेत्यांनी पोलीस आणि मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कारवाई स्थगित करा, अशी आग्रही मागणी केली. थोड्या वेळाने काँग्रेस नेत्यांनीच माईक हाती घेऊन रस्त्यावर आलेल्या मुसलमानांना उद्देशून भाषणबाजी सुरू केली. मशिदीवरील महापालिकेची कारवाई आठ दिवसांसाठी स्थगित केली आहे. यामुळे रस्त्यावर आलेल्यांनी शांतपणे घरी जावे आणि महापालिकेची अडवून ठेवलेली वाहने परत जाऊ द्यावी, असे काँग्रेस नेते म्हणाले. 

अतिक्रमण स्वतः हटवणार, मशिदीच्या विश्वस्तांचे महापालिकेला आश्वासन

धारावीतील ९० फूट रस्त्यावरील मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी चार ते पाच दिवसांची मुदत मागितली. मुंबई महानगरपालिकेने बजावलेल्या निष्कासन नोटीसनंतर विश्वस्तांनी केलेली लेखी विनंती प्रशासनाकडून मान्य करण्यात आली आहे. ठरलेल्या मुदतीत हे अतिक्रमित बांधकाम काढून टाकावे, असे निर्देशही विश्वस्तांना देण्यात आले आहेत, असे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

न्यायालयाच्या आदेशानुसारच कारवाई - फडणवीस

धारावीतल्या मशिदीचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. या आदेशांचे पालन करत पालिकेचे पथक आधी घटनास्थळी पोहोचले होते. पण मशिदीच्या व्यवस्थापनाने ईदनंतर अनधिकृत बांधकाम काढू असे सांगितले. आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. यावेळी पण मुंबई महापालिकेचे पथक घटनास्थळी गेले त्यावेळी चार - पाच दिवसांत आम्हीच अनधिकृत बांधकाम काढू असे मशिदीच्या व्यवस्थापनाने सांगितले. ही माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

           

सम्बन्धित सामग्री