Sunday, August 31, 2025 10:00:56 AM

गुलाबराव पाटलांची दुटप्पी भूमिका चर्चेत

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांची असताना गुलाबराव पाटलांनी हे वक्तव्य केले आहे.

गुलाबराव पाटलांची दुटप्पी भूमिका चर्चेत

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदाच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्रीपद भाजपाकडे जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद घ्यावं असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांची असताना गुलाबराव पाटलांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे या वक्तव्याची सर्वत्र चर्चा आहे. मात्र गुलाबराव पाटलांनी गृहखात्यावर दावा केल्याचे पाहायला मिळाले.   

 

विधानसभेच्या निकालानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक घेतली. त्यात भाजपाला बहुमत असल्याने मुख्यमंत्रीपद भाजपाकडे जाणार असल्याचे शाह यांनी सांगितले. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रस पक्षाला उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचे यांनी म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेकडून गृहमंत्री पदावर दावा करण्यात आला. शिंदे मुख्यमंत्री असताना गृहखाते भाजपाकडे होते. आता मुख्यमंत्रीपद भाजपाकडे असल्याने गृहखाते शिवसेनेला मिळावे अशी मागणी वारंवार शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातच आता शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी आमची गृहखात्याची मागणी कायम असल्याचे म्हटले आहे. केंदाचा आदेश मान्य करावा लागेल असेही पाटील यांनी म्हटले आहे.

 

'स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहाता शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं'

एकीकडे एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारावे आणि शिवसेनेला गृहखाते मिळावे असे गुलाबराव म्हणत आहेत. तोच दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता त्यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी दुटप्पी भूमिका गुलाबरावांनी मांडली आहे. एकूणच काय तर शिवसेनेला गृहखाते मिळावे ही इच्छा पाटलांनी व्यक्त केली आहे.

 

   


सम्बन्धित सामग्री