हैद्राबाद: पुष्पा चित्रपटानंतर प्रेक्षकांना आतुरता होती ती पुष्पा 2 चित्रपटाची. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचे मोठ्या प्रमाणात चाहते आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षक वाट पाहत असलेल्या 'पुष्पा 2: द रूल' हा चित्रपट दिनांक 5 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या आगाऊ बूकिंगची सुरुवात ही 30 नोव्हेंबर रोजी सुरु झाली होती. या चित्रपटानं 24 तासात तब्बल 7.08 कोटींची कमाई केली होती. 'पुष्पा 2' विषयी प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा २’च्या प्रीमियरच्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू देखील झाला होता. यावर आता अभिनेता अल्लू अर्जुनने दुःख व्यक्त करत मदतीची घोषणा केली आहे.
काय आहे पोस्ट
पुष्पा-2 फेम अल्लू अर्जुनने या घटनेचा उल्लेख करत एक व्हिडिओ पोस्ट केले आहे. त्यांनी लिहिलं, “एका थिएटरमध्ये दु:खद घटनेने खूप दु:खी झालो. या कठीण समयी परिवाराच्या प्रती माझ्या संवेदना आहेत. मी सांगू इच्छितो की, या दु:खात ते एकटे नाहीत आणि मी त्या परिवारालादेखील वैयक्तिकरित्या भेटेन. ...मी या कठिण प्रसंगी प्रवासातून जाताना मी त्यांना प्रत्येक प्रकारची मदत करण्यासाठी प्रतिबद्ध आहे.”
दरम्यान अल्लू अर्जुनने संवेदना व्यक्त केली असून संबंधित परिवाराला आश्वासन दिलं आहे. ‘नेहमी तुमच्यासाठी मदतीला असेल’ असे अल्लू अर्जुनने म्हटले आहे. अल्लू अर्जुनने हे देखील सांगितले की, ‘सद्भावना’ म्हणून 25 लाख रुपये मदत करत आहेत. त्याचबरोबर सिनेमा पाहणाऱ्यांसाठी त्याने आवाहन देखील केलं आहे थिएटर जाताना सावधानी बाळगण्याचे आवाहन अभिनेता अल्लू अर्जुनने केले आहे.