Thursday, August 21, 2025 02:09:27 AM

एनएमसी, बीएमसीवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

मुंबई महापालिकेच्या भांडुप येथील सुषमा स्वराज रुग्णालयात मोबाइल टॉर्च लाइटच्या साहाय्याने केलेल्या सी- सेक्शनच्या प्रसूतीमध्ये एका महिलेला जीव गमवावा लागला.

एनएमसी बीएमसीवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

मुंबई :  मुंबई महापालिकेच्या भांडुप येथील सुषमा स्वराज रुग्णालयात मोबाइल टॉर्च लाइटच्या साहाय्याने केलेल्या सी- सेक्शनच्या प्रसूतीमध्ये एका महिलेला जीव गमवावा लागला. या घटनेची नॅशनल मेडिकल कमिशनने (एनमएसी) दखलही न घेतल्याने उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची एनएमसी स्वतःहून दखल घेऊन कारवाई करणार नाही का? असा सवाल करत न्यायालयाने मंगळवारी एनएमसीच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. न्या. रेवती मोहिते- डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर प्रसूतीनंतर मृत्यू झालेल्या शाहिदुन्निसा शेख यांच्या पतीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होती. त्या दिवशी रुग्णालयात वीज नव्हती. जनेरटर बंद होते म्हणून मोबाइल टॉर्च लाइटच्या साहाय्याने प्रसूतीचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.

           

सम्बन्धित सामग्री