Wednesday, September 03, 2025 02:34:02 PM

भाजपाचा विरोध डावलून अजित पवार मलिकांच्या प्रचाराला

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात जाहीररित्या नवाब मलिक यांचा प्रचार केला.

भाजपाचा विरोध डावलून अजित पवार मलिकांच्या प्रचाराला

मुंबई : नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका भाजपाने जाहीर केली आहे. भाजपाच्या या भूमिकेकडे कानाडोळा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात जाहीररित्या नवाब मलिक यांचा प्रचार केला. 

भाजपाने मलिकांना उमेदवारी देण्यास विरोध केला होता. पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना पक्षाकडून एबी फॉर्म दिला. यामुळे नवाब मलिक हे मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. पक्षाध्यक्ष या नात्याने अजित पवारांनी नवाब मलिकांचा मतदारसंघात प्रचार केला. 

नवाब मलिक प्रकरण 

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित व्यक्तीशी आर्थिक व्यवहार केल्यामुळे नवाब मलिक यांच्या विरोधात न्यायालयात खटला सुरू आहे. हा खटला सुरू असल्यामुळे आणि आरोप गंभीर असल्यामुळे भाजपाने नवाब मलिक यांना महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून सहभागी करुन घेण्यास नकार दिला होता. विधानसभेच्या निवडणुकीत नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपाचा पाठिंबा नसेल अशीही भूमिका भाजपाने घेतली. भाजपाची भूमिका जाहीर असूनही आत्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिकांना उमेदवारी अर्ज भरण्याकरिता एबी फॉर्म दिला.


सम्बन्धित सामग्री