Mukesh Ambani Mother Health Latest Update : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी ( Mukesh Ambani) आणि त्यांचे भाऊ अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या आई कोकिलाबेन अंबानी (Kokilaben Ambani) यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना शुक्रवारी सकाळी एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना एअरलिफ्ट करून मुंबईतील एनएल रिलायन्स रुग्णालयात (HN Reliance Hospital) आपत्कालीन स्थितीत दाखल करण्यात आले.
हेही वाचा - Billionaires of India : अंबानी कुटुंबाकडे अदानींपेक्षा दुप्पट संपत्ती; बहुतेक अब्जाधीश 'या' शहरातले
कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल
91 वर्षीय कोकिलाबेन अंबानी यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात नेण्यात आले. इथे डॉक्टरांची संपूर्ण टीम त्यांच्या उपचारात गुंतली आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीबद्दल कुटुंबाकडून कोणतीही अपडेट जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, संपूर्ण कुटुंब मुंबईला पोहोचले आहे. मुकेश अंबानी सकाळी कालिनी विमानतळावर दिसले. अनिल अंबानी त्यांच्या पत्नी टीना अंबानीसोबत एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दिसले.
कोकिलाबेन अंबानी या रिलायन्सचे संस्थापक स्वर्गीय धीरुभाई अंबानी यांच्या पत्नी आहेत. अद्याप रिलायन्स किंवा अंबानी कुटुंबाकडून याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. त्यांचं वय वाढल्याने त्यांना आरोग्य विषयक तक्रारी सतावत आहेत. दरम्यान त्यांना नेमकं काय झालं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.
हेही वाचा - RBI Policy : आरबीआय पॉलिसी मिनिट्समधील वाढ, आरबीआय आणि सरकारी सदस्यांमध्ये मतभेद