Wednesday, September 03, 2025 08:22:54 AM

'शरद पवारांना नोटीस पाठवलीच नाही'

सुप्रिया सुळे म्हणतात की टिंगरेंनी शरद पवारांना नोटीस पाठवली. पण मी शरद पवारांना नोटीस पाठवलेली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार सुनिल टिंगरे म्हणाले.

शरद पवारांना नोटीस पाठवलीच नाही

पुणे : सुप्रिया सुळे म्हणतात की टिंगरेंनी शरद पवारांना नोटीस पाठवली. पण मी शरद पवारांना नोटीस पाठवलेली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार सुनिल टिंगरे म्हणाले. सुनिल टिंगरे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 

पुण्याच्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप टिंगरेंवर झाला होता. हा आरोप टिंगरेंनी फेटाळला होता. याच प्रकरणामुळे टिंगरेंना उमेदवारी मिळणार की नाही असा प्रश्न चर्चेत होता. अखेर टिंगरेंना उमेदवारी जाहीर झाली आणि हा प्रश्न मागे पडला. आता प्रचार काळात टिंगरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

टिंगरेंनी शरद पवारांना नोटीस पाठवली असा आरोप लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. पण हा आरोप सुनिल टिंगरे यांनी फेटाळला. 


सम्बन्धित सामग्री