Monday, September 01, 2025 05:05:49 PM

बहिणींना दमदाटी करणे धनंजय महाडिकांना भोवले

बहिणींना दमदाटी करणे धनंजय महाडिकांना भोवले. निवडणूक आयोगाने महाडिकांना नोटीस बजावली आहे.

बहिणींना दमदाटी करणे धनंजय महाडिकांना भोवले

कोल्हापूर : लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन विरोधकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांचे फोटो काढा आणि त्यांची नावं लिहून घ्या; अशा स्वरुपाचे वक्तव्य भाजपा खासदार धनंजय महाडिक यांनी केले. हे वक्तव्य महाडिकांना भोवले आहे. निवडणूक आयोगाने या वक्तव्याप्रकरणी धनंजय महाडिक यांना नोटीस बजावली आहे. तातडीने खुलासा मागितला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी ही नोटीस बजावली आहे. नोटीस येताच चुकीची जाणीव झालेल्या धनंजय महाडिक यांनी सार्वजनिक कार्यक्रमात जाहीर माफी मागत परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.


सम्बन्धित सामग्री