मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अज्ञात महिलेने तोडफोड केली आणि ती महिला घटनास्थळावरून निघून गेली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली. सकाळपासून राजकीय वर्तुळातून या घटनेवर प्रतिक्रिया येत आहेत. नुकतच भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्हिडिओच्या माध्यमातून या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
वाघ म्हणाल्या कि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या कार्यालयावर धिंगाणा घालणार्या महिलेची ओळख आता पटली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या कार्यालयावर धिंगाणा घालणार्या महिलेची ओळख आता पटली आहे पण मला आता विरोधकांची कीव कराविशी वाटते. कुठलीही माहिती न घेता सकाळ झाली की बोंबा मारणार्यांनी आतातरी विचार केला पाहिजे. विरोधक मनोरुग्णांसारखे वागत आहेत का, याचे त्यांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे.