Thursday, September 04, 2025 09:26:18 PM

पोहरादेवीचे महंत भाजपाच्या वाटेवर

बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला.

पोहरादेवीचे महंत भाजपाच्या वाटेवर

वाशिम : बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. उद्धव ठाकरे भेटीसाठी वेळ देत नाहीत हे कारण देत महंत सुनील महाराज यांनी पक्ष सोडला. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महंत सुनील महाराज यांनी पक्षप्रवेश केला तर कारंजा विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवाराला निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री