मुंबई: विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. याआधी देखील राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्षपदी होते, परंतु आता नार्वेकर यांनी पुन्हा एकदा अर्ज भरल्याने महायुती आणि भाजपने नार्वेकरांना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा संधी दिल्याचे दिसून येत आहे. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. शिंदे सरकारच्या अडीच वर्षांच्या कालावधीत राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष होते.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी सोमवारचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी रविवारी दुपारी बारावाजेपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत देण्यात आली होती . त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. 288 सदस्यांच्या सभागृहात महायुतीकडे 237 जणांचे संख्याबळ आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा विजय नक्की आहे. महायुतीच्या जागावाटपात विधानसभेचे अध्यक्षपद भाजपकडे असणार आहे. त्यानुसार भाजपने पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याच नावाला पसंती दिल्याचे समजते आहे.
दरम्यान विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. याआधी देखील राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्षपदी होते, परंतु आता नार्वेकर यांनी पुन्हा एकदा अर्ज भरल्याने महायुती आणि भाजपने नार्वेकरांना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा संधी दिल्याचे दिसून येत आहे. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.