Sunday, August 31, 2025 11:09:04 AM

चर्चा शिवसेनेच्या स्ट्राईक रेटची

राज्याच्या विधानसभेच्या 288 पैकी 85 जागा लढवणाऱ्या शिवसेनेने आतापर्यंत 49 जागांवर विजय मिळवला आणि 8 जागांवर आघाडी घेतली.

चर्चा शिवसेनेच्या स्ट्राईक रेटची

मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या 288 पैकी 85 जागा लढवणाऱ्या शिवसेनेने आतापर्यंत 49 जागांवर विजय मिळवला आणि 8 जागांवर आघाडी घेतली. एकूण 57 जागांवर शिवसेनेची सरशी होत असल्याचे चित्र आहे. ही उल्लेखनीय कामगिरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने केली. दणदणीत विजय मिळाल्यानंतर ठिकठिकाणी शिवसेनेच्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत नृत्य करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महायुतीने विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 231 जागांवर विजय मिळवला किंवा आघाडी घेतली. महायुतीत भाजपाने 133, शिवसेनेने 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागांवर विजय मिळवला किंवा आघाडी घेतली.

मविआ विधानसभेच्या 288 पैकी 45 जागांवरच विजय मिळवू शकली किंवा आघाडी घेऊ शकली. मविआत ठाकरे सेनेने 20, काँग्रेसने 15 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागांवर विजय मिळवला किंवा आघाडी घेतली. इतर बारा जागांवर विजयी झाले किंवा आघाडी घेऊ शकले. महायुतीच्या या विजयी झंझावातापुढे मविआचा पालापाचोळा झाला. दणदणीत विजय मिळाल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. 

विकास प्रकल्प आणि कल्याणकारी योजना यांची प्रभावी अंमलबजावणी महायुतीसाठी लाभदायी ठरली. तर व्होट जिहाद आणि आरक्षणाचे राजकारण याचा फायदा होईल या आशेवर राहिलेली मविआ तोंडावर आपटली. राज्यातील मतदारांनी मविआला नाकारत महायुतीवर विश्वास टाकला.     

भारतीय जनता पार्टी 100 जागांवर विजयी आणि 33 जागांवर आघाडीवर
शिवसेना 47 जागांवर विजयी आणि 10 दहा जागांवर आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस 37 जागांवर विजयी आणि 4 जागांवर आघाडीवर  
महायुतीत भाजपाने 133, शिवसेनेने 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागांवर विजय मिळवला किंवा आघाडी घेतली. 
महायुतीने विधानसभा निवडणुकीत 231 जागांवर विजय मिळवला किंवा आघाडी घेतली.


सम्बन्धित सामग्री