मुंबई : लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांचे आभार. मागील अडीच वर्षात केलेल्या कष्टांचे फळ म्हणजे महायुतीला मिळालेला हा विजय आहे. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे आभार. त्यांच्या प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष पाठिंब्याच्या जोरावर महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे; या शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेचे जाहीर आभार मानले.
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी तर महायुतीचा महाविजय या शब्दात निवडणुकीतील विजयाचे वर्णन केले. महायुतीच्या कल्याणकारी योजना आणि विकासाला चालना देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी केलेल्या कामांना विजयाच्या रुपाने पोचपावती मिळाल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीत महायुती 216 जागांवर आघाडीवर आहे. भाजपा 125, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे.
राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही नेते आघाडीवर आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची विजयाच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू आहे.
भाजपा - 2014 - 122 जागांवर विज
भाजपा - 2019 - 105 जागांवर विजय
शिवसेना 2014 - 63 जागांवर विजय
शिवसेना 2019 - 41 जागांवर विजय
राष्ट्रवादी काँग्रेस 2014 - 41 जागांवर विजय
राष्ट्रवादी काँग्रेस 2019 - 54 जागांवर विजय
मोदी संध्याकाळी दिल्लीत भाजपा मुख्यालयात येणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत संध्याकाळी सात वाजता भाजपाच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. याप्रसंगी पंतप्रधान मोदी भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीच्या निकालावर तसेच ठिकठिकाणच्या पोटनिवडणुकांतील निकालांवर बोलतील