मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मिळालेल्या विजयाला "हिंदुत्वाचा विजय" असे वर्णन करत मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी प्रतिक कर्पे म्हणाले, “राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि विकासाच्या व्हिजनमुळे महाराष्ट्रात आज ऐतिहासिक विजय मिळाला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा सन्मान करणाऱ्यांना कौल दिला असून औरंगजेब फॅन क्लबला स्पष्टपणे नाकारले आहे. हा विजय म्हणजे महाराष्ट्रातल्या नवीन पर्वाची आणि हिंदुत्वाच्या त्सुनामीची सुरुवात आहे.”
भाजपमधील कार्यकर्त्यांचे मोठे योगदान :
प्रतिक कर्पे यांनी भाजपमधील सर्व कार्यकर्ते, हिंदुत्ववादी संघटना, संत समाज आणि राज्यातील हिंदू समाजाचे मोठे योगदान आहे. असेही कर्पे म्हणाले.