Friday, September 05, 2025 11:10:39 AM

निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुटी

परिस्थितीचा आढावा घेऊन १८ ते २० नोव्हेंबर अशी सलग तीन दिवस विद्यार्थ्यांसाठी सुटी जाहीर करण्यास स्थानिक प्रशासनाला स्वातंत्र्य

निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुटी

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला राज्यात  मतदान होणार आहे. या काळात अनेक शिक्षक निवडणूक कामकाजाच्या कर्तव्यावर असतील. राज्यातील अनेक शाळांमध्ये मतदान केंद्र किंवा निवडणुकीशी संबंधित कामकाज सुरू असेल. यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊन १८ ते २० नोव्हेंबर अशी सलग तीन दिवस विद्यार्थ्यांसाठी सुटी जाहीर करण्यास स्थानिक प्रशासनाला स्वातंत्र्य देण्यात आले आहे. प्रशासन शाळा व्यवस्थापनांशी समन्वय ठेवून कोणत्या शाळा बंद ठेवायच्या आणि कोणत्या नाही याबाबतचा निर्णय घेईल.


सम्बन्धित सामग्री