धाराशिव :उमरगा तालुक्यातील निळू नगर तांड्यावर तीन शाळकरी मुलींनी आपल्याच अपहरणाचा कट रचला आणि कोरियन डांस ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी पुण्याच्या दिशेने निघाल्या. मात्र, पोलिसांच्या दक्षतेमुळे हा बनावट अपहरणाचा कट अवघ्या काही मिनिटांमध्ये उधळून लावण्यात आला आणि तिन्ही मुलींना ताब्यात घेतले.
काय आहे घटनेमागची कथा :
निळू नगर तांडा येथील तीन मुली शाळेतील सुट्टीनंतर एका पिवळ्या रंगाच्या स्कुलबसमध्ये बसल्या आणि त्यानंतर त्यांनी एक बनावट अपहरणाचा कट रचला. त्या म्हणाल्या की, त्यांना काही लोकांनी चाकूचा धाक दाखवून किडनॅप केले आहे. त्यानंतर मुलींनी आपल्या वडिलांना फोन करून अपहरण झाल्याची माहिती दिली, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली.
परंतु, धाराशिव पोलिसांची त्वरित कारवाई सुरु झाली आणि मोबाईल सिम लोकेशनच्या माध्यमातून मुलींच्या स्थितीचा ठावठिकाणा मिळवला. पोलिसांनी तात्काळ तपास करत, मोहळ (सोलापूर) येथे मुलींना ताब्यात घेतले. मुलींनी सांगितले की, त्यांनी घरातूनच 5,000 रुपये चोरले आणि पुण्यात जाऊन पैसे कमावून कोरियाला जाण्याचा कट रचला होता.
पोलिसांनी त्वरित किडनॅपिंगच्या केसचा तपास सुरू केला. त्याच वेळी, शाळेतील शिक्षकांनीही पोलिसांना त्वरित सूचित केले. मुलींच्या बनावट अपहरणाचा कट उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन केले.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
मुलींनी सांगितले की, त्यांनी कोरियातील प्रसिद्ध BTS-V सिंगर आणि डांसर ग्रुपला भेटण्यासाठी पुण्यात जाऊन पैसे कमावण्याचा प्लॅन केला होता. हे तीन मुली ग्रामीण भागातील असून, त्यांच्या कोरियातील सिंगर आणि डांसर ग्रुपच्या प्रेमात पडल्यामुळे त्यांना कोरिया गाठायचे होते.
आश्चर्यजनक घटना:
ही घटना ग्रामीण भागात घडली आहे, जिथे मुलींच्या असामान्य इच्छेमुळे आणि त्यांचा कोरियन डांस ग्रुपच्या आकर्षणामुळे त्यांनी अपहरणाची बनावट रचली होती. हा प्रकार ग्रामीण भागातील मुलींनी अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रोत्साहने कशापद्धतीने भुरळ पडली हे जरा आश्चर्यजनकच आहे.
पोलिसांनी मुलींचा मानसिक समुपदेशनही सुरू केले असून, या प्रकाराने त्यांना भविष्यात अशा गदारोळात न पडता योग्य मार्गदर्शन मिळवण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना ग्रामीण मुलींच्या मानसिकतेत होणारे बदल आणि पाश्चिमात्य प्रोत्साहनांचे बळी याबद्दल पालकांना व शाळांना मुलांच्या मानसिक आणि भावनिक स्थितीवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे दिसते.