नवी दिल्ली : युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केलेला आहे. युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोवर डझनावारी ड्रोन हल्ले केले आहेत. ज्यात अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त असून हल्ल्याने विमान सेवेवर देखील मोठा परिणाम झाला असून अनेक विमाने वळविण्यात आली आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार युक्रेनने मॉस्कोवर किमान 34 ड्रोनद्वारे हल्ले केले आहेत. 2022 मधील युद्धानंतरचा युक्रेनचा रशियाची राजधानीवर झालेला सर्वात मोठा ड्रोन हल्ला म्हटला जात आहे. हल्ल्यामुळे शहरातील तीन प्रमुख विमानतळावरील उड्डाणांना डायवर्ट करावे लागले आहे. हल्ल्यात एक जण जखमी झाला आहे. शियन वायू सेनेने रविवारी तीन तासांत पश्चिम रशियाच्या अन्य क्षेत्रात 36 ड्रोन नष्ट केल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. रशियन संघ क्षेत्रात विमानाच्या सारखे ड्रोन वापरुन दहशतवादी हल्ला करण्याचा युक्रेन सरकारचा प्रयत्न निष्प्रभ केल्याचे रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. रशियन टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेल्या अन ऑफीशयली व्हिडीओत ड्रोन आकाशात उडताना दिसत आहेत.
हेही वाचा : महाराष्ट्र पोलीस अकादमी मैदानावर दीक्षांत सोहळा