Train Stunt Viral Video: सोशल मीडियावर व्ह्यूज आणि फॉलोअर्ससाठी लोक काय करत नाहीत? अशाच एका 'रीलबाजा'चा व्हिडिओ समोर आला आहे, जो रीलसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतो. व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.. उत्तर प्रदेशातील एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल..
उत्तर प्रदेश (UP) मधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण चालत्या ट्रेनच्या खिडकीतून लटकत आहे. ही क्लिप मायक्रोब्लॉगिंग साइट X वर @gharkekalesh या हँडलवरून पोस्ट करण्यात आली. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले - रीलसाठी स्टंट करताना, एक तरुण चालत्या ट्रेनमधून सटकला.. पडलाही.. पण थोडक्यात बचावला. लोकांनी त्याला कसेतरी वाचवले. जेव्हा हे प्रकरण व्हायरल झाले तेव्हा कानपूर झोनच्या एडीजींनीही त्यावर प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - आरोग्यदायी दह्यातही भेसळ? फेविकॉल किंवा मायोनीजसारखं दिसतंय दही; 'अमूल दही'चा व्हिडीओ पाहून बसेल धक्का!
ट्रेनच्या खिडकीत एक मिनिट लटकला; काहीही होऊ शकलं असतं..!
या 1 मिनिट 10 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये, तरुण 56 सेकंदांसाठी एका प्रवाशाचा हात धरून ट्रेनच्या बाहेर लटकत आहे. अचानक ट्रेन थांबते. अर्थातच, कोणीतरी या रीलबाजाचा जीव वाचवण्यासाठी साखळी ओढली असावी. ट्रेन थांबताच तो तरुण खाली पडतो आणि थोडासा जखमी होतो. थोड्या वेळाने तो उठतो आणि पुन्हा ट्रेनमध्ये चढतो. ही ट्रेन कासगंजहून कानपूरला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
आतापर्यंत या पोस्टला 99 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि दीड हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, अनेक सोसल मीडिया युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक व्यक्तीने म्हटलं - शीट यार.. वाचला. दुसऱ्याने कमेंट केली - भारतात कलाकारांची कमतरता नाही. यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे? कमेंट्समध्ये सांगा.
कानपूर झोनच्या एडीजींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सरकारी रेल्वे पोलिस (GRP) UP ला टॅग केले आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. यानंतर जीआरपी यूपीने एसपी जीआरपी आग्रा यांना चौकशी करण्यास सांगितले. एसपी जीआरपी आग्रा यांनी तात्काळ प्रतिसाद दिला आणि सांगितले की, फारुखाबाद रेल्वे पोलीस स्टेशनला आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तथापि, या प्रकरणात अद्याप कोणतीही पोलीस कारवाई झाल्याचे वृत्त नाही.
हेही वाचा - उड्डाणपुलावरून पाडला नोटांचा पाऊस, पैसे पकडायला लोक धावले; चमत्कारिक प्रकाराचं कारण जाणून डोक्याला हात लावाल..